‘गोदरेज’ने विकत घेतले आर. के. स्टुडिओचे हक्क


मुंबई – आता गोदरेज कंपनीने बॉलिवूडच्या सुवर्ण काळाचा साक्षीदार असलेल्या आर. के. स्टुडिओचे मालकी हक्क घेतले आहेत. लवकरच मुंबईतील चेंबूरमध्ये दिमाखात उभा असलेला आर. के. स्टुडिओ पाडण्यात येणार आहे. आता गोदरजे कंपनीला आर.के स्टूडिओचे मालकी हक्क देण्यात आले आहेत. कंपनीने हा स्टुडिओ विकत घेतल्याची अधिकृत घोषणादेखील केली आहे. हा स्टुडिओ पाडून येथे अलिशान फ्लॅट्स उभारले जाणार असल्यामुळे आर. के. स्टुडिओ हा इतिहासजमा होणार आहे.

कपूर कुटूंबियांची गोदरेज कंपनीबरोबर गेल्या काही दिवसांपासून स्टुडिओच्या जागेविषयी चर्चा सुरू होती. पण अद्याप स्टुडिओच्या विक्रीची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या स्टुडिओच्या जागेवर आलिशान फ्लॅट्सची उभारणी करण्यात येणार आहे. आर. के. स्टुडिओतून मिळणार उत्पन्न आणि खर्च हा परवडणारा नसल्यामुळे कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला होता. या स्टुडिओमध्ये भारतीय सिनेृष्टीतील बरेचसे चित्रपट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रपटांचा साक्षीदार असलेला हा स्टुडिओ आता पाडण्यात येणार आहे.

Leave a Comment