आधी आई आणि आता पत्नी झाल्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा


वेलिंग्टन – आपल्या दीर्घकालीन प्रियकराशी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डर्न यांनी लग्नगाठ बांधली आहे. मागच्या महिन्यात न्यूझीलंडमधील मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर जसिंडायांचे लग्न चर्चेचा विषय ठरला आहे. अत्यंत रोचक कहानीही त्यांच्या लग्नामागे दडलेली आहे. आर्डन आणि क्लार्क गेफोर्ड यांनी इस्टरच्या सुट्टयांमध्ये लग्नगाठ बांधली.

एखाद्या कहानीसारखेच न्यूझीलंडच्या पंतप्रधान असलेल्या आर्डर्न यांचे प्रेम प्रकरण आहे. ५ वर्षापूर्वी त्यांच्या प्रियकराने त्यांना आपल्या मतदार संघातील एका समस्येबाबत तक्रार केली होती. दोघेही त्यावेळी संपर्कात आले. गेफोर्डला नेहमीच्या भेटींमुळे त्यांच्याशी प्रेम झाले. आर्डर्न यांना त्यावेळी त्याची चाहूलही लागली नव्हती. पण गेफोर्डने एकेदिवशी मोठ्या हिमतीने जसिंड यांना प्रपोज केले होते. लग्नापूर्वीच गेल्या वर्षी त्यांना मुलगी झाली. जसिंडा त्यावेळीही चर्चेत आल्या होत्या. पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्यानंतर त्या जगातील दुसऱ्या अशा महिला पंतप्रधान आहेत ज्यांना पंतप्रधान असताना मातृत्व अवकाश घ्यावा लागला.

एका टीव्ही चॅनेलमध्ये गेफोर्ड हे काम करतात. त्यांना मुलगी झाल्यानंतर आपल्या कामावरुन सुट्टी घ्यावी लागली होती. मागील एक वर्ष त्यांनीच तिचा सांभाळ केला. त्यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की प्रियकर म्हणून मी जसिंडा यांची ‘लिपस्टीक’ दाताला लागू नये एवढ्यापर्यंत काळजी घेतो.

जेसिंडा नुकत्याच न्यूझीलंड येथे झालेल्या बॉम्ब हल्ल्यामुळे चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी केलेल्या कारवायांमुळे त्या प्रशंसेच्या विषय बनल्या होत्या. आता त्यांच्या लग्नानंतर आगामी निवडणुकांमध्ये काय परिणाम होणार, यावर जगाचे लक्ष लागून राहणार आहे.

Leave a Comment