या दिवशी रिलीज होणार ‘सॅटलाइट शंकर’


‘हिरो’ चित्रपटाद्वारे बॉलिवूड अभिनेते आदित्य पांचोली यांचा मुलगा सुरज पांचोलीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याचा हा पहिला चित्रपट त्याला विशेष प्रसिद्धी मिळवून देण्यात यशस्वी ठरला नाही. सुरज यानंतर आता ‘सॅटलाइट शंकर’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

हा चित्रपट येत्या ६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सुरज २०१५ मध्ये आलेल्या हिरो चित्रपटानंतर आता तब्बल ४ वर्षांने बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. या चित्रपटात सुरज एका लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात सुरजशिवाय मेघा आकाशची महत्त्वाची भूमिका असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, मुरद खेतानी, क्रिशन कुमार आणि अश्विन वरदे करत असून चित्रपटाची कथा विशाल विजय कुमार यांनी लिहिली आहे. तर इरफान कमल यांचे दिग्दर्शन आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment