पुढील वर्षाच्या जानेवारीमध्ये रिलीज होणार अनुराग बासुंचा आगामी चित्रपट


लवकरच एक नवीन चित्रपट घेऊन बर्फी या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बासु प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दरम्यान अद्याप चित्रपटाचे नाव निश्चित झाले नसले तरी प्रदर्शनाची तारीख मात्र ठरली आहे. हा चित्रपट २०२० मध्ये जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिषेक बच्चन, राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा आणि पंकज त्रिपाठी हे कलाकार चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट तगडी स्टारकास्ट आणि उत्तम दिग्दर्शक यांच्या जोरावर सिनेमागृह गाजवेल, यात काही शंका नाही.

भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, क्रिशन कुमार, अनुराग बासु आणि पत्नी तानी बासु हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. पुढील वर्षी २४ जानेवारीला चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment