लवकरच ‘स्टुडंट ऑफ द ईअर २’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता टायगर श्रॉफ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबतच या चित्रपटात अनन्या पांडे आणि तारा सुतारियादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटातील एक नवे रिलीज करण्यात आले असून यात टायगरसोबत ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ची एक्स स्टुडंट अर्थात आलिया भट्टदेखील दिसत आहे.
आलिया आणि टायगरचा जबरदस्त डान्स आणि रोमँटीक केमिस्ट्री या गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या गाण्याचे शीर्षक हुक अप साँग असे आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात वरूण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या.
‘स्टुडंट ऑफ द ईअर २’च्या गाण्यात झळकली एक्स स्टुडंट
आता प्रेक्षकांना या सिक्वलमधूनही याच एक्स स्टुडंट आलियाची झलक पाहायला मिळत आहे. आलियासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळत असल्याने खूप आनंदी असल्याचे टायगरने म्हटले आहे. दरम्यान मे महिन्यात १० तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.