आता घर साफ करा शाओमीच्या ‘वायरलेस झाडू’ने


चीनी कंपनी शाओमीने आतापर्यंत आपल्या विविध स्मार्टफोनच्या जोरावर भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय ठरली आहे. त्यानंतर या कंपनीने इतर उत्पादनांच्या निर्मितीत ही पाऊल ठेवले आहे. त्यातच शाओमीने स्मार्ट बल्ब आणि व्हॅक्युम क्लिनर यासारखी घरगुती उत्पादने आणल्यानंतर कंपनीने आता (Mi Wireless Handheld Sweeper) वायरलेस झाडू सादर केला आहे.

हा इलेक्ट्रिक झाडू डबल ब्रश डिझाइनसह कंपनीने लाँच केला आहे. याच्या ब्रशचा 1300r/min एवढा स्पीड आहे. या झाडूचे रोटेशनल फंक्शन हे मुख्य वैशिष्ट्य असल्यामुळे हा झाडू कोणत्याही दिशेला सहजतेने फिरवता येतो आणि याद्वारे जलदगतीने साफसफाई करण्यास मदत होते असा कंपनीचा दावा आहे. या झाडूचे आकारमान 270mm x 170mm एवढे आहे.

या झाडूमध्ये कंपनीकडून 2,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. परिणामी सातत्याने हा झाडू चार्ज करावा लागणार नाही, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर दोन तासांचा बॅकअप मिळेल असे कंपनीने म्हटले आहे. हा वायरलेस झाडू चीनमध्ये लाँच केला असून तेथे त्याची किंमत 99 युआन म्हणेज भारतीय चलनात जवळपास 1 हजार 30 रुपये एवढी किंमत आहे. कंपनीच्या क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवर हा इलेक्ट्रिक झाड़ू विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

Leave a Comment