रणवीर सिंहचा हा रेट्रो लूक तुम्हाला नक्कीच आवडेल


भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या ‘८३’ या चित्रपटामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर सिंह हा बराच चर्चेत आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने १९८३ मध्ये विश्वचषक जिंकला होता. यात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंह साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. नुकताच एक फोटो सोशल मीडियावर रणवीर सिंहने शेअर केला आहे. या फोटोतील लूक पाहून हा ‘८३’ चित्रपटातील लूक असल्याचे बोलले जात आहे.

खुद्द कपिल देवने ‘८३’ चित्रपटासाठी रणवीर सिंहला क्रिकेटचे बारकावे सांगितले आहे. इतर कलाकारांबद्दल सांगायचे तर एमी विर्क बलविंदर सिंहची भूमिका करणार आहे. ज्यांनी ८३ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिजला क्लीन बोल्ड केले होते.

View this post on Instagram

रेट्रो

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on


क्रिकेटर संदीप पाटील यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटील करणार आहे. ऑल राउंडर मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत साकीब सलीम दिसणार आहे. त्यावेळी ते इंडिया टीमचे उपकर्णधार होते. वर्ल्ड कपच्या सेमी फायनल व फायनलमध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅच घोषित केले होते.


ताहिर भसीन सुनील गावस्कर यांची भूमिका व जतिन सरना यशपाल शर्मा यांची भूमिका साकारणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता जीवा माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका साकारणार आहे. दिलीप वेंगसरकर यांची भूमिका मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे साकारणार आहे. तर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत साहिल खट्टर दिसणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी पीआर मान सिंह यांची भूमिका करणार आहे. मान सिंह १९८३मध्ये वर्ल्ड कप टीमचे मॅनेजर होते. तर ऑल राउंडर रोजर बिन्नीच्या भूमिकेत निशांत दहिया दिसणार आहे.

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने १९८३चा विश्वचषक जिंकला होता. कपिल देव यांची मुलगी या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आमिया काम पाहणार आहे. ‘८३’ची टीम शूटिंग करिता लंडनसाठी १५ मे रोजी रवाना होणार आहेत.

Leave a Comment