हैदराबादमधील कंपनीने बनवली इलेक्ट्रीक स्कूटी - Majha Paper

हैदराबादमधील कंपनीने बनवली इलेक्ट्रीक स्कूटी


हैदराबाद : बाईक किंवा स्कूटीची क्रेझ कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात असते. हैदराबादमधील एक स्टार्टअप कंपनी हेच डोळ्यासमोर ठेऊन तरुणांसाठी खास स्कूटी घेऊन येत आहे. ही स्कूटी लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार आहे. विशेष म्हणजे पर्यावरणाचा विचार करता या स्कूटीमध्ये पेट्रोलच्या ऐवजी विजेवर चालणारी स्कूटी कंपनीने तयार केली आहे. या स्कूटीचे नाव प्युअर ईव्ही असे आहे.

यंदा भारतात दहा हजार विजेवर चालणाऱ्या प्युअर ईव्ही स्कूटी लाँच करणार आहेत. हैदराबादमधील एक स्टार्टअप PuREnergy चा प्युअर ईव्ही भाग आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांवर ही कंपनी काम करत आहे.

विजेवर चालणाऱ्या वाहनांना पेट्रोल- डिझेलची वाढती किंमत आणि पेट्रोल-डिझेलमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारकडूनही प्रोत्साहन दिले जात आहे. सरकारनेही यासाठी फेम इंडिया योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी सरकारने 10 हजार कोटी रुपयांचे बजेट ठरवले. विजेवर चालणाऱ्या वाहनांना फेम इंडिया योजनेअंतर्गत 10 लाख विजेवर चालणाऱ्या रजिस्टर स्कूटी गाड्यांवर प्रत्येकी 20 हजार रुपये दिले जातील.

प्रत्येकी 50 हजार रुपये विजेवर चालणाऱ्या रिक्षालाही दिले जाणार आहेत. 35 हजार इलेक्ट्रॉनिक फोर व्हीलरलाही प्रत्येकी दीड लाखांची मदत दिली जाणार. देशात आतापर्यंत 2 लाख 78 हजार विजेवर चालणाऱ्या गाड्यांची विक्री झाली आहे. या विजेवर चालणाऱ्या वाहनांनी दररोज 52 हजार लीटरपेक्षा अधिक पेट्रोलची बचत होणार आहे.

Leave a Comment