भारतात लॉन्च झाली दुकाटीची स्वस्त बाईक


नवी दिल्ली : सुपरबाईक बनवणारी इटालियन प्रसिद्ध कंपनी दुकाटीने (Ducati) स्क्रॅम्बलर ही नवीन बाईक भारतात लाँच केली आहे. 7 लाख 89 हजार रुपये ते 10 लाख 49 हजार रुपयांच्या दरम्यान या बाईकची (एक्स-शोरुम) किंमत आहे. पाच प्रकारचे व्हेरियंट या बाईकमध्ये दिले आहेत.

दोन रंगांमध्ये दुकाटीच्या नव्या बाईक उपलब्ध आहेत. पिवळा आणि केसरी असे दोन रंग दिले आहेत. बाईकची डिझाईनही सर्वांना आकर्षित करत आहेत. नव्या बाईकमध्ये पाच प्रकारचे व्हेरियंट दिले आहेत. आयकॉन, मॅच 2.0, क्लासिक, फुल थ्रोटल, कॅफे रेसर हे पाच व्हेरियंट दिले आहेत. प्रत्येक व्हेरियंटची किंमत वेगवेगळी आहे.

13 लीटरची फ्यूअल टँक या बाईकमध्ये दिली आहे. तसेच 6 गिअर, 803 सीसी, इलेक्ट्रॉनिक फ्यूअल इंजेक्शन दिले आहे. गाडीमध्ये एबीस सिस्टम असून 170 किलो वजनाची गाडी आहे. दुकाटी गाडीचे नाव महागड्या बाईकमध्ये नेहमी घेतले जाते. दुकाटीच्या प्रत्येक बाईकची किंमत ही 15 लाख ते 50 लाखांपर्यंत आहे. मात्र पहिल्यांदाच कंपनीने स्वस्त बाईक लाँच केली आहे. भारतात कंपनीने स्क्रॅम्बलर ही बाईक लाँच केली असून या बाईकची किंमत 7 लाखांपासून ते 10 लाखांपर्यंत आहे. भारतातील प्रत्येक शहरात दुकाटीच्या या नव्या बाईकची किंमत वेगवेळी आहे. राज्यानुसार टॅक्स आणि इतर गोष्टींचा त्या किंमतीत समावेश केला जातो.

Leave a Comment