सलमानच्या ‘भारत’मधील दुसऱ्या गाण्याचा टीझर रिलीज


बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानच्या चित्रपटांच्या प्रतिक्षेत नेहमीच त्याचे असंख्य चाहते असतात. तो त्याच्या आगळ्या-वेगळ्या कृतीतून चाहत्यांचे मनोरंजन करतो. त्याच्या ‘भारत’ चित्रपटाच्या सध्या चर्चा भलत्याच रंगत आहेत. नुकत्याच त्याच्या बहुप्रतिक्षित ‘भारत’ चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

या गाण्याचे ‘मीठी-मीठी चाशनी’ असे बोल आहेत. हे गाणं अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफवर चित्रीत करण्यात आले आहे. खुद्द सलमान खानने या गाण्याचा टिझर त्याच्या ट्विटर अकाउंटवरून रिलीज केला आहे. त्याने टीझर पोस्ट करताना कॅप्शनमध्ये ‘इस ईद, इश्क मीठा हैं’ असे लिहिले आहे.

Leave a Comment