या कारणांमुळे हिट झाला ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’


आपल्या देशात सध्याच्या घडीला 17व्या लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु असल्यामुळे देशात सर्वत्र निवडणुका आणि मतदान याबद्दलची चर्चा सुरु आहे. पण या निवडणुकांच्या गरमागरमीत आपल्याकडे एक वर्ग असा आहे की, तो ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा चित्रपट पाहण्यासाठी सध्या उत्सुक आहे. हा ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ सीरिजमधील शेवटचा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. अॅव्हेंजर्सचे भारतात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. अॅव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटाने भारतात प्रदर्शित होताच 100 कोटी रुपयांची कमाई केली.

हा चित्रपट मार्व्हल स्टूडीओने बनवला आहे. अॅव्हेंजर्सचे संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात चाहते असल्यामुळे ज्यांनी हा चित्रपट पाहिला नसेल त्या अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, असे काय अॅव्हेंजर्स एंडगेम चित्रपटात आहे की, सर्वजण एवढे आकर्षित होत आहेत.

बाहुबली चित्रपट तुम्हाला आवडला होता, त्यातील अॅनिमेशन अप्रतिम होते, पाहताना मजा येत होती. मार्व्हलच्या चित्रपटातून बाहुबली चित्रपटातील काही सीन कॉपी केलेले आहेत. बाहुबली चित्रपटात जशी बाहुबली भूमिका सर्वांना आकर्षित करत आहे, तसेच अॅव्हेंजर्समध्ये अनेक सुपरहिरो आहेत त्यांनी सर्वांना आकर्षित केले आहे. हल्क, कॅप्टन अमेरिका, ब्लॅक व्हिडो, थोर, आयर्न मॅन, ब्लॅक पँथर, स्कारलेच व्हिच, व्हिजन, होकाई, ग्रूट, अँट मॅन, कॅप्टन मार्व्हल आणि इतर महत्त्वाच्या भूमिका आहेत.

टेक्नॉलॉजीचा योग्य वापर मार्व्हल स्टुडीओने केला आहे. रिअॅलिटी मार्व्हलच्या चित्रपटात दिसत आहे. यामध्ये एडिटिंगचे कामही छान आहे. मार्व्हलच्या चित्रपटात स्वस्त आणि कमी दरातील अॅनिमेशनचा वापर केला जात नाही. अॅव्हेंजर्सचा यापूर्वीच्या चित्रपटातील अर्ध्याहून अधिक सुपरहिरो थैनोसने गायब केलेले आहेत. हे कसे केले? यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. सध्या प्रदर्शित करण्यात आलेल्या एंडगेममध्ये सुपरहिरो पुन्हा आलेले आहेत.

स्टेनली मार्व्हलचे वडील आहेत, म्हणजे सर्व भूमिका आणि कथा स्टेनलीची देण आहे. स्टेनलीचा गेल्यावर्षी मृत्यू झाला. अॅव्हेंजर्सच्या प्रत्येक चित्रपटात नेहमी स्टेनलीची गेस्ट एन्ट्री होते. अॅव्हेंजर्स एंडगेममध्येही होईल, असे म्हटले जात आहे. स्टेनलीला पडद्यावर पाहण्यासाठी अनेकांना उस्तुकता असते.

अॅव्हेंजर्समधील थैनोस सुपर व्हिलन आहे. खूप पावरफुल असा व्हिलन आहे, त्याने गेल्या चित्रपटात अॅव्हेंजर्सवर हल्ला केला होता. पण सर्व अॅव्हेंजर्सनी एकत्र येत त्यांनी थैनोसचा पराभव केला आहे. ते सर्व हे कसे करतात, हे पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.

Leave a Comment