उत्तर प्रदेशातील मतदान केंद्रातून गायब झाले ईव्हीएम


महोबा – काल सोमवारी उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यात चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर एक ईव्हीएम मशीन गायब झाल्याची घटना घडली आहे. जिल्हा प्रशासनाने यानंतर तत्काळ ईव्हीएमचा शोध सुरू केला आहे. ईव्हीएम शोधून देणाऱ्यास दहा हजारांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे.

मतदान अधिकारी पथक हमीरपूर महोबा लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी मतदान पार पडल्यानंतर मतदान यंत्र घेऊन आले. तेव्हा पनवाडी ब्लॉकच्या नौगाव फदना येथील 127 क्रमांकाच्या बूथमधील ईव्हीएम मशीन गायब झाल्याचे आढळले. जिल्हा प्रशासनात यानंतर एकच खळबळ उडाली आणि फदना गावात प्रशासनाने ईव्हीएमचा शोध सुरू केला. पण ईव्हीएम सापडले नाही. मशीन गायब झाल्याची घोषणा लाउडस्पीकरवरून करुन ईव्हीएम शोधणाऱ्यास दहा हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

बुथ प्रमुख कमलेश कुमार आणि मतदान अधिकारी शरद हे फदना गावातील मतदान झाल्यानंतर पॉलिटेक्निक ग्राउंडमध्ये ईव्हीएम जमा करण्यासाठी गेले, तेव्हा बूथ नबंर १२७ ची ईव्हीएम मशीन तेथे नव्हती. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी याप्रकारानंतर पथकाला रात्रभर त्याठिकाणी बसून मशीनचा शोध सुरू केला होता.

Leave a Comment