करण जोहर पंतप्रधान झाल्यास हे असतील त्याचे मंत्री!


शनिवारी २७ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या छोट्या पडद्यावरील हिट कॉमेडी शो द कपिल शर्मा शोच्या भागात काजोल आणि करण जोहर खास पाहूणे म्हणून आले होते. कपिल एकीकडे करण जोहरचे कौतुक करताना थकत नव्हता. करणने या सगळ्यात कपिलची खूप थट्टा उडवली. कपिलचे इंग्रजी बोलणे असो किंवा त्याच्या इतर गोष्टी सगळ्याबद्दल करण मजा घेत होता. कपिलने यावेळी हलक्या फुलक्या अंदाजात कार्यक्रमात निवडणुकांचे रंगही भरले.

कपिलने करणला सध्याच्या लोकसभा निवडणुकांवरून काही मजेशीर प्रश्न विचारले. करणला कपिलने विचारले की, जर तू पंतप्रधान झालास तर कोणत्या कलाकाराला मंत्रालयातील कोणते काम देशील. कपिलने यावर काही पर्यायही दिले. आरोग्य मंत्रालयाचे पर्याय कपिलने दिल्यावर करणने क्षणाचाही विलंब न लावता अक्षय कुमारचे नाव घेतले. करण यावर म्हणाला की, अक्षयच्या शरीरात कोणतीच कृत्रिम गोष्ट जात नाही. तो फार सशक्त आहे आणि दूध, तूप, लोणी अशा गोष्टी खातो.

करणने गॉसिप मंत्रालयाचं नाव ऐकताच करिना कपूरचे नाव लिहिले. करण म्हणाला की, ती सकाळी उठल्यावर तिच्या नेटवर्कच्या माध्यमातून सर्व गॉसिप मिळवते. तसेच कोणत्या गोष्टीवर अधिकृत माहिती हवी असेल तर ती मला फोन करते आणि आम्ही त्यावर चर्चा करतो. करणने फॅशन मंत्रालयाच्यावेळी सोनम कपूरचे नाव घेतले. एकूणच प्रश्न उत्तरांची ही फेरी फार करमणूक करणारी होती.

Leave a Comment