साध्वी प्रज्ञा एक ‘महान संत’ – उमा भारती


कटनी – उमा भारती यांची मध्य प्रदेशातील कटनी येथे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याशी तुलना केली असता साध्वी प्रज्ञा एक ‘महान संत’ असल्याचे त्यांनी सांगितले. आपण त्यांच्यासमोर एक मूढ प्राणी असल्याचे भारती यांनी म्हटले आहे. भोपाळ येथून मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

उमा भारती यांनी नुकतेच भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद स्वीकारले आहे. तसेच, निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. स्वतःही उमा भारती साध्वी आहेत. तसेच, भाजपच्या त्या मोठ्या नेत्या आहेत. राजकारणात प्रज्ञा ठाकूर यांनी नुकताच प्रवेश केला आहे. सध्या हिंदुत्ववाद्यांचा साध्वी प्रज्ञा या चेहरा मानल्या जात आहेत. भोपाळमध्ये त्यांच्याविरोधात काँग्रेसचे दिग्विजय सिंह लढणार आहेत. १२ मे रोजी भोपाळमध्ये मतदान होणार आहे. तर, २३ मे रोजी निकाल हाती येतील.

Leave a Comment