‘द ग्रेट खली’ विरोधात तृणमूलची निवडणूक आयोगाकडे तक्रार


भोपाळ – लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना डब्लूडब्लूईमधील प्रसिद्ध भारतीय रेसलर ‘द ग्रेट खली’ दिसून आला. मध्यप्रदेशच्या जाधवपूर मतदारसंघात २६ एप्रिल रोजी भाजप उमेदवार अनुपम हाजरा यांच्या प्रचारात खली सहभागी झाला होता. पण त्याला प्रचार केल्याने अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

प्रचारात खली सहभागी झाल्याने त्याच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तृणमुल काँग्रेस पक्षाने तक्रार केली आहे. अमेरिकेचे नागरिकत्व खलीने स्वीकारले असल्यामुळे एखादा विदेशी नागरिक येथील मतदारांच्या मनावर प्रभाव पाडू शकत नसल्याचे तृणमुल काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे.

द खली हा डब्लूडब्लूईमध्ये भारतीय रेसलर म्हणून ओळखला जातो. उंचच्या-उंच आणि धिप्पाड शरीरयष्टीमुळे अनेक रेसलरांना तो धडकी भरवतो. डब्लूडब्लूईतील सुपरस्टार अंडरटेकरला चितपट केल्याने खली प्रकाशझोतात आला होता.

Leave a Comment