बाजारपेठेत आली आता शाओमीची नवी इलेक्ट्रिक बाईक


बिजींग (चीन) : भारतात शाओमी कंपनीला बजेट स्मार्टफोन म्हणून ओळखले जाते. आता ही कंपनी स्मार्टफोनशिवाय टीव्ही, फोन एक्सेसरीज, फिटनेस बँड, एअर प्यूरिफायर आणि इतर प्रोडक्ट्सही विकत असते. कंपनीने याशिवाय आता चीनमध्ये इलेक्ट्रॉनिक बाईक लाँच केली आहे. या बाईकचे Himo T1 असे नाव आहे.

जसे कमी किंमतीत शाओमीचे स्मार्टफोन आहेत, तसेच सर्व सामान्यांना परवडेल अशा किंमतीत त्यांनी लाँच केलेली बाईकही आहे. या बाईकची किंमत 31 हजार रुपये आहे. कंपनीच्या क्राऊडफंडिग प्लॅटफॉर्मवर नवीन बाईक पाहू शकतात. कंपनीकडून लाँच करण्यात आलेली Himo T1 ही पहिली इलेक्ट्रॉनिक बाईक नसून, कंपनीने यापूर्वीही Himo V1 आणि Himo C20 फोल्डिंग बाईक लाँच केल्या आहेत.

तीन रंगात ही बाईक उपलब्ध आहे. लाल, ग्रे आणि व्हाईट रंगाचा यामध्ये समावेश आहे. Himo T1 मध्ये 14,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 14ah/28ah चा एनर्जी ऑप्शन बाईकमध्ये दिला आहे. म्हणजे 14ah च्या मदतीने यूजर्स 60 किमी पर्यंत बाईक चालवू शकतो. बाईकमध्ये फ्रंट सस्पेंशन फोर्क, ड्यूअल क्वाईलओर रिअर सस्पेंशन, ड्रम ब्रेक आणि फ्रंटमध्ये डिस्क ब्रेकची सुविधा दिली आहे. या बाईकचे वजन 53 किलो आहे.

Leave a Comment