ट्विंकलला ‘या’ पक्षात करायचा प्रवेश


पंतप्रधान मोदींची अभिनेता अक्षय कुमारने घेतलेली मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे. राजकारणापलिकडचे मोदी या मुलाखतीत नागरिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला गेला. पण, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना मोदींचा प्रचार करत असल्याचे अनेकांनी या मुलाखतीनंतर म्हटले.

अनेक स्तरातून यामुळे दोघांवर टीका होऊ लागल्या. ट्विंकलने आता यावर उत्तर देत कोणत्या पक्षात आपण प्रवेश करण्यास उत्सुक आहे याबद्दल खुलासा केला आहे. कोणाच्या ट्विटवर प्रतिक्रिया देण्याचा अर्थ मी कोणाचा प्रचार करते असा होत नाही. मी सध्या तरी केवळ मला जो पक्ष व्होडकाची पार्टी देईन आणि मी ज्यामुळे दुसऱ्या दिवशीपर्यंत हँगओव्हरमध्ये राहीन अशाच पक्षासोबतच असल्याचे ट्विंकलने ट्विट करत म्हटले आहे. आता नेटकरी ट्विंकलच्या या स्पष्टीकरणावर कितपत विश्वास ठेवणार हे माहिती नाही.

Leave a Comment