‘ब्लँक’मधील ‘अली अली’ गाणे रिलीज


सनी देओल आणि नवोदित चेहरा करण कपाडीया बहुप्रतीक्षित ‘ब्लँक’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतेच अॅक्शनचा भरपूर भरणा असलेल्या या चित्रपटातील एक नवे गाणे रिलीज करण्यात आले आहे. करणसोबत या गाण्यात अक्षय कुमारही ठेका धरताना दिसत आहे.

अक्षय आणि करणच्या या गाण्यामधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाण्याचे ‘अली अली’ असे शीर्षक आहे. अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे गाणे शेअर केले आहे. आर्को आणि बी प्राक यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. तर आर्को आणि अदीप सिंह यांनी हे गाणे लिहिले आहे.

मुंबईच्या एका स्टूडिओमध्ये या गाण्याचे चित्रीकरण केले गेले आहे. दरम्यान ब्लँक चित्रपटाचे दिग्दर्शन बेहजाद खंबाटा यांनी केले आहे. तर, डॉ. श्रीकांत भासी, निशांत पिट्टी, टोनी डिसुजा आणि विशाल राणा यांची निर्मिती आहे. मे महिन्यात ३ तारखेला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.

Leave a Comment