बाजारात लवकरच येणार २० रुपयांची नोट


नवी दिल्ली – दोन हजाराची नोट दोन वर्षांपूर्वी बाजारात आली. आता बाजारात २० रुपयांची नवी नोट येत आहे. ही नोट बाजारात गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या सहीनिशी येईल, अशी घोषणा रिझर्व बँकेकडून करण्यात आली आहे.

हिरवट पिवळ्या रंगाची २० रुपयांची ही नवी नोट असेल. वेरुळ लेण्यांचे छायाचित्र तिच्या पाठीमागच्या बाजूला असेल. भारतीय संस्कृतीचा जे वारसा दर्शविते, अशी माहिती रिझर्व बँकेने दिली. ही नोट लवकरच चलनात येईल. ६३ मिमी लांब आणि १२९ मिमी रुंद या नोटेचा आकार असेल. रोमन आणि देवनागरी लिपीमध्ये नोटेच्या समोरच्या भागावर आकडे असतील. तसेच, नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचे छायाचित्र असेल. त्यावर आरबीआय, भारत, इंडिया आणि २० ही नावे लिहिलेली असतील.

Leave a Comment