नवी दिल्ली – ईपीएफ खाते असणाऱ्या कर्मचाऱ्यांना खूश करणारा निर्णय केंद्रीय अर्थमंत्रालयाने घेतला आहे. ईपीएफओने २०१८-१९ वर्षासाठी ईपीएफवर ८.६५ व्याजदर करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सुमारे ६ कोटी कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. गेल्या ३ वर्षातील सर्वात अधिक व्याजदर ईपीएफवर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
ईपीएफवर मिळणार ८.६५ टक्के व्याज
वित्तीय सेवा विभाग (डीएफएस) हा अर्थ मंत्रालयाचा विभाग असून ईपीएफओच्या व्याजदरातील वाढीला या विभागाने मंजुरी दिली आहे. फेब्रुवारीमध्ये ईपीएफवरील व्याजदर वाढविण्याचा निर्णय कामगार मंत्री संतोश गंगवार यांनी घेतला. ईपीएफओच्या केंद्रीय मंडळ ट्रस्टचे गंगवार हे अध्यक्ष आहेत. यापूर्वी ईपीएफओचा व्याजदर हा २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के होता. तर ईपीएफओच्या व्याजदर हा २०१६-१७ मध्ये २०१५ च्या तुलनेत कमी म्हणजे ८.६५ टक्के एवढा होता.