या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार परिणीती चोप्रा


नुकतीच ‘केसरी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेत्री परिणीती चोप्रा आली होती. यानंतर तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा आता करण्यात आली आहे. हॉलिवूडच्या ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चित्रपटाचा हा चित्रपट हिंदी रिमेक असणार असून या चित्रपटात परिणीती मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती परिणीती चोप्राने दिली आहे. तर अद्याप चित्रपटाचे शीर्षक निश्चित झाले नसल्याचे चित्रपट व्यापार विश्लेषक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या जुलै महिन्यात यूकेमध्ये सुरूवात होणार आहे. तर हा चित्रपट २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन रिभू दासगुप्ता करणार आहेत. तर याची निर्मिती रिलायन्स एंटरटेन्मेंट आणि अंबलीन एंटरटेन्मेंट करणार आहे. हा एक रहस्यमय आणि रोमांचकारी चित्रपट असणार आहे. परिणीतीच्या या चित्रपटाला आता प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment