तुमच्या भेटीला आले 'स्टुडंट ऑफ द ईअर २' मधील नवे गाणे - Majha Paper

तुमच्या भेटीला आले ‘स्टुडंट ऑफ द ईअर २’ मधील नवे गाणे


करण जोहर निर्मित टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘स्टुडंट ऑफ द ईअर २’ चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणे काही दिवसांपूर्वीच रिलीज आले होते. आता त्यापाठोपाठ चित्रपटातील आणखी एक गाणे रिलीज करण्यात आले आहे.

या गाण्याचे बोल ‘मुंबई दिल्ली दी कुडिया’ असे असून नेहमीप्रमाणेच गाण्यात टायगरचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. तर अनन्या आणि तारा त्याच्यासोबत ठुमके लगावताना दिसत आहे. या गाण्याला देव नेगी, पायल देव आणि विशाल दललानी यांनी आवाज दिला आहे.

या गाण्याचे संगीत दिग्दर्शन शेखर आणि विशाल यांनी केले आहे. तर रेमो डिसूझाने हे गाणे कोरिओग्राफ केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुनित मल्होत्रा करत आहे. हा चित्रपट येत्या १० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment