‘दबंग 3’च्या माध्यमातून सलमानची भाची करणार बॉलिवूडमध्ये प्रवेश

salman-khan
आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत अभिनेता सलमान खानची भाची असून ‘दबंग 3’मधून सलमानची बहीण अल्विरा आणि दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री यांची कन्या अलिजेह अग्निहोत्रीला लाँच करणार असल्याची माहिती आहे. नुकतेच मध्य प्रदेशात ‘दबंग 3’च्या चित्रीकरणाचे पहिले शेड्यूल सलमानने पूर्ण केले. अलिजेह यावेळी नव्हती, पण पुढच्या टप्प्यात ती सहभागी होणार असल्याचे म्हटले जाते.

2020 मधील ईदच्या मुहूर्तावर ‘दबंग 3’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अरबाज खानने केली असून दिग्दर्शकाच्या खुर्चीत प्रभूदेवा आहे. वॉण्टेडनंतर प्रभूदेवा-सलमानच्या जोडीकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. 2010 मध्ये दबंग सीरिजचा पहिला भाग आला होता. अनुराग कश्यपने त्याचे दिग्दर्शन केले होते. तर दबंग- 2 चे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते. ‘दबंग 3’मध्ये चुलबूल पांडेची बायको रज्जो म्हणून सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. दबंगमधून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दबंगच्या तिसऱ्या भागात आयटम साँगमध्ये मलायका अरोरा दिसणार नाही, तर करिना झळकणार असल्याची चर्चा आहे.

Leave a Comment