आरबीआय जारी करणार 200 आणि 500 रुपयांच्या नवीन नोटा येणार - Majha Paper

आरबीआय जारी करणार 200 आणि 500 रुपयांच्या नवीन नोटा येणार

RBI
नवी दिल्ली : आता लवकरच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 200 आणि 500 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात येणार असून भारतीय रिझर्व्ह बॅंकेने ट्विटरच्या माध्यमातून यासंबंधीची माहिती दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही महात्मा गांधी सिरीज असलेल्या नव्या नोटांवर असणार आहे.

महात्मा गांधी सिरीज असलेली 200 रुपयांची नवीन नोट भारतीय रिझर्व्ह बॅंक जारी करणार आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांची या नोटांवर सही असणार आहे. आधीच्या नोटांसारखीच 200 रुपयांच्या नवीन नोटांची डिझाइन असणार आहे. तसेच, 200 रुपयांच्या नवीन नोटा व्यवहारात आणल्यानंतर आधीच्या नोटाही स्वीकारल्या जाणार आहेत.

गव्हर्नर शक्तिकांत दास यांची भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून जारी करण्यात येणाऱ्या 500 रुपयांच्या नोटांवर सही असणार आहे. महात्मा गांधी सिरीजच्या या नोटा सुद्धा असणार आहेत. आधीच्या नोटांसारखीच 500 रुपयांच्या नवीन नोटांची डिझाइन असणार आहे. तसेच, 500 रुपयांच्या नवीन नोटा व्यवहारात आणल्यानंतर आधीच्या नोटाही स्वीकारल्या जाणार आहेत.

Leave a Comment