अभिनेत्री आमी त्रिवेदीची दयाबेनसाठी मनधरणी

TMKOC
दिशा वकानी हिने ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेमधून काढता पाय घेतल्यानंतर मालिकेत होत असलेल्या दयाबेन या पात्राच्या चर्चांना पूर्णविराम लागले आहे. तर दयाबेनची भूमिका कोण साकारणार या चर्चांनी आता जोर धरला आहे. निर्मात्यांचा दयाबेन पात्राच्या शोधासाठी चांगलाच आटापिटा चालू आहे. अभिनेत्री आमी त्रिवेदीला दयाबेनच्या भूमिकेसाठी अप्रोच करण्यात आल्याच्या चर्चा रंगत आहेत.

याबाबत आमीला विचारण्यात आल्यानंतर, आपल्याला दयाबेनच्यी भूमिकेबद्दल कोणत्याही प्रकारची विचारणा न करण्यात आल्याचे तिने स्पष्ट केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे निर्माते आमीला दिशा वकानीच्या जागेवर घेण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्याचप्रमाणे आमीचे मित्रमंडळीही तिला दयाबेनची भूमिका साकारण्यासाठी आग्रह करत आहेत. परंतू निर्मात्यांकडू कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे.

निर्माते असित मोदी मागील काही दिवसांपासून मालिका ‘दयाबेन’ भूमिकेच्या शोधात आहेत. असित मोदी म्हणाले, दयाबेन पात्रासाठी मला शोधकार्य सुरू करावे लागणार आहे. कलाकारापेक्षा कोणताही कार्यक्रम मोठा नसतो. तारक मेहता का उलटा चष्मा दिशा वकानी शिवाय पुढे मार्गक्रमण करेल. तर आता दयाबेन ही लोकप्रिय व्यक्तीरेखा कोण साकारणार हे बघणे औत्सुक्याचे असणार आहे.

Leave a Comment