नारायण राणे लिहित आहेत आत्मचरित्र

narayan-rane
मुंबई – आमदार नितेश राणे यांनी माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे हे आत्मचरित्र लिहित असून लवकरच त्याचे प्रकाशन होईल. अब आएगा मजा, सबका हिसाब होगा”, असे ट्विट केले आहे. बुधवारी दुपारी आमदार नितेश राणे यांनी ट्विट केले. नितेश राणे या ट्विटमध्ये म्हणतात, माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे यांचे आत्मचरीत्र येणार असून अब आएगा मजा, सबका हिसाब होगा.


युतीचे सरकार असताना शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नारायण राणे यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले होते. त्यांनी आघाडीची सत्ता असताना शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी २०१७ मध्ये काँग्रेसला रामराम करत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन पक्षाची स्थापना केली.

यंदाच्या निवडणुकीत नारायण राणे स्वबळावर रिंगणात उतरले असून ते सध्या राज्यसभेत खासदार आहे. भाजपच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेत गेले आहेत. नारायण राणे आता त्यांच्या आत्मचरित्रात नेमका काय उल्लेख असेल, ते आत्मचरित्रात शिवसेनेबाबत काय लिहिणार, मोठ्या नेत्यांबाबत काही गौप्यस्फोट आत्मचरित्रात करणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Comment