संपूर्ण महाराष्ट्रात कागर चित्रपटातील युवराज आणि राणीची बरीच चर्चा रंगत आहे. रिंकू राजगुरू ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचे वास्तवादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे. तर या चित्रपटामधून शुभंकर तावडे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतो आहे.
प्रेक्षकांची चित्रपटाच्या टीझरला आणि ट्रेलरला पसंती तर मिळालीच आहे पण या चित्रपटामधील संगीताला देखील प्रेक्षकांची दाद मिळत आहे. कागर चित्रपटातील “दरवळ मव्हाचा” हे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे ज्यामध्ये युवराज आणि राणीचे हळूवार फुलत जाणारे प्रेम बघायला मिळत आहे. या गाण्यामधील रिंकू दोन्ही लुक्समध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे.
रिंकूच्या ‘कागर’मधील आणखी एक गाणे रिलीज
येत्या २६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात वायाकॉम१८ स्टुडीओज प्रस्तुत आणि वायाकॉम१८ स्टुडीओज – उदाहरणार्थ निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने दिग्दर्शित “कागर” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.