या दिवशी ‘वनप्लस 7’चे लाँचिंग

oneplus
प्रिमियम श्रेणीतील लोकप्रिय मोबाईल कंपनी वनप्लसच्या ‘वनप्लस 7 ‘या नव्या फोनच्या लाँचिंगबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अंदाज बांधले जात होते. पण अखेरीस ‘वनप्लस 7 ‘ या स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीख शेवटी ठरली आहे. 14 मे रोजी जगभरात ‘वनप्लस 7’ लाँच केला जाणार आहेत. कंपनीकडून अमेरिका, युरोप आणि भारतात लाँचिंग इव्हेंट आयोजित केले जाणार आहे. तसेच या इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील करण्यात येणार आहे.

वनप्लस 7 चे फोटो इंटरनेटवर गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल होत आहेत. अनेक अंदाज या फोनच्या फिचर्सबाबतही बांधले जात होते. मंगळवारी या नव्या फोनच्या लाँचिंग बाबत वनप्लसचे सीईओ पेट लऊ यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. लऊ यांनी सांगितले की हा नवा फोन डिस्प्लेच्या बाबतीत याआधीच्या फोनपेक्षा अधिक चांगला असणार आहे. या फोनच्या डिस्प्लेवर कंपनी तिप्पट खर्च करणार असल्याचेही लऊ यांनी सांगितले. या फोनमध्ये 90Hz पेक्षा जास्त रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. अॅपलच्या आयपॅड प्रो मध्ये यापूर्वी 120Hz डिस्प्ले वापरण्यात आला आहे. त्यामुळे वनप्लसच्या या नव्या फोनचा डिस्प्ले आतापर्यंतचा कंपनीचा सर्वोत्कृष्ट असणार आहे. या नव्या डिस्प्लेमुळे फोनची किंमत जास्त असू शकते.

कंपनीकडून वनप्लस 7 च्या स्पेसिफिकेशन्सबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. पण हा फोन 5G सपोर्ट करणारा असू शकतो असा अंदाज बांधला जात आहे. वनप्लसच्या मोबाईलमध्ये वापरण्यात येणारा स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट प्रोसेसर 5G सपोर्ट करणारा प्रोसेसर आहे. वनप्लस 7 हा त्यामुळे 5G सपोर्ट असलेला हा पहिला स्मार्टफोन असू शकतो. तसेच या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असल्याचाही अंदाज लावला जात आहे.

Leave a Comment