लक्ष्मी अग्रवालसह दीपिकाची पंगत - Majha Paper

लक्ष्मी अग्रवालसह दीपिकाची पंगत

deepika-padukone
‘छपाक’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यासाठी अभिनेत्री दीपिका पादुकोण सज्ज झाली आहे. अॅसिड पीडित लक्ष्मी अग्रवालसह नुकताच तिने दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतल्याचे समोर येत आहे. ‘छपाक’ चित्रपटाचे पहिले शेड्यूल दीपिकाने पूर्ण केले आहे. दिल्लीत चित्रपटाची २५ मार्च रोजी शुटिंग सुरू केली होती.

हा चित्रपट ऑसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालच्या काही कठीण प्रसंगावर बेतलेला असून चित्रपटाच्या माध्यमातून ऑसिड हल्ला होवूनही आयुष्य स्वछंदीपणे जगणाऱ्या कर्तुत्ववान स्त्रीच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.‘छपाक’मध्ये दीपिका साकारत असणाऱ्या पात्राचे नाव ‘मालती’ आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत. फॉक्स स्टार स्टुडिओज आणि दीपिका पादुकोणच्या केए एंटरटेनमेंटखाली चित्रपटाची निर्मिती होणार आहे. १० जानेवारी २०२०ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे अभिनेता अजय देवगणचा ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ सुध्दा १० जानेवारी २०२० ला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Leave a Comment