लग्नाआधीच अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गरोदर !

arjun-rampal
काही दिवसांपूर्वीच साऊथ अफ्रिकन मॉडल गॅबरिलासोबत आपल्या नात्याची बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने कबुली दिली होती. अर्जुन रामपालने इन्स्टाग्रामवर मंगळवारी गर्लफ्रेंड गॅबरिला गरोदर असल्याची बातमी शेअर केली आहे. इन्स्टावर अर्जुनने गॅबरिला सोबतचा फोटो शेअर केला आहे ज्यात तिचे बेबी बम्प दिसत आहे. हा फोटो अर्जुनने शेअर केल्यावर अनेक सिलेब्सने त्याचे अभिनंदन केले आहे.


पहिल्या पत्नीपासून अर्जुनला दोन मुली आहेत. माहिका आणि मायरा अशी त्यांची नावे आहेत. मेहर जेसिका आणि अर्जुनने एकमेकांसोबत 20 वर्ष संसार केला. अर्जुन त्याची गर्लफ्रेंड गॅबरिलासोबत गेल्या काही महिन्यांपासून बिनधास्तपणे मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत होता. पाली हिलच्या एका अपार्टमेंटमध्ये दोघे लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. पत्नी मेहर जेसिकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अर्जुन मॉडेल गॅबरिलात गुंतला. हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. यानंतर अनेक इव्हेंटला दोघेही एकत्र दिसू लागले. गॅबरिला एक आफ्रिकी मॉडेल असून तिने ‘सोनाली केबल’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण बॉक्सऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.

Leave a Comment