अमिताभ बच्चन ‘कंचना’साठी होणार तृतीयपंथीय

amitabh-bacchan
सध्या सगळीकडेच दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटांचे देशभरात चाहते सातत्याने वाढत आहेत. २०११ मध्ये तमिळ चित्रपटांमधील सर्वात नावाजलेला ‘मुनी २- कंचना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचा आता हिंदी रिमेक होत आहे. अक्षय कुमार या रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

राघव असे त्याच्या भूमिकेचे नाव असून एक तृथीयपंथी महिलेची त्याच्यात आत्मा असते आणि त्या आत्म्याचा हेतू तिच्या मृत्यूचा सूड घेणे असतो. या चित्रपटाचे अक्षयने चित्रीकरण सुरू केले आहे. या चित्रपटाशी आता अजून एक मोठे नाव जोडले जाणार आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

यासंदर्भात डेक्कन क्रोनिकलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अमिताभ कंचनाच्या हिंदी रिमेकमध्ये आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदा तृथीयपंथीची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ते चित्रपटात कंचनाच्या भूमिकेत दिसतील. कंचना ही एक अशी तृतीयपंथी महिला असते जी आपल्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी राघवच्या शरीरात जाते. तमिळ चित्रपटात ही भूमिका आर. शरद कुमारने साकारली होती.

अमिताभ बच्चन यांनी १९८१ मध्ये आलेल्या ‘लावारिस’ चित्रपटात महिलेची व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ या गाण्यातही शहेनशहा यांनी महिलाची व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटाचे शिर्षक सध्या नक्की झाले नसून ‘लक्ष्मी’ असे नाव ठेवले जाऊ शकते अशी चर्चा बी- टाऊनमध्ये सध्या सुरू आहे. मूळ चित्रपटाच्या संहितेत अनेक बदल करण्यात आले असून बॉलिवूडच्या प्रेक्षकांची आवड पाहून कथेत बदल केले आहेत.

Leave a Comment