काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केल्याप्रकरणी एसीपी नरसिंह यादव यादव निलंबन

narsimha-yadav
मुंबई – निवडणूक आयोगाने कुस्तीपटू आणि मुंबई पोलिसांमध्ये एसीपी पदावर कार्यरत असलेल्या नरसिंह यादव यांच्यावर कारवाई केली आहे. ही कारवाई अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी केली आहे. काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारात नरसिंह यादवने सहभाग घेतला होता.

पण निवडणूक प्रचारात सरकारी सेवेत असणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला सहभागी होता येत नाही. नरसिंह यादववर यासाठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईच्या आंबोली पोलिस स्थानकात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या शस्त्रागार विभागात नरसिंह यादव कार्यरत आहे. राज्यभरातील १४ मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान पार पडल्यामुळे नरसिंह यादवच्या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडतायत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment