नेटफिक्सचे क्रेझ भारतात दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नेटफिक्सवरील सीरिज अनेकजण पाहात असतात. तसेच त्यावर येणाऱ्या नवनव्या सीरिजची वाट देखील पाहात असतात. नेटफिक्सवर सीरिजसह अनेक चित्रपट देखील प्रदर्शित होतात. आता नेटफिक्स ओरिजनल चित्रपटात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस देखील काम करणार आहे. सोशल मीडियाद्वारे याची माहिती तिने दिली आहे.
फराह खानसाठी जॅकलीन होणार ‘मिसेस सीरियल किलर’
Just a very excited PSA that @Asli_Jacqueline is officially part of the Netflix fam with Mrs. Serial Killer. Here's hoping that if we are ever framed for murder, she's got our back! pic.twitter.com/bHhiyCKFJm
— Netflix India (@NetflixIndia) April 24, 2019
माझा नेटफिक्स ओरिजनल चित्रपट येणार असल्याचे सांगताना मला आनंद होत आहे. मिसेस सीरियल किलर असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटासाठी मी फार उत्सुक असल्याचे जॅकलीनने ट्विट केले आहे. मिसेस सीरियल किलर हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री असल्याची चर्चा आहे. फराह खान या चित्रपटाची निर्मिती करणार असून दिग्दर्शन फराहचे पती शिरीष कुंदर करणार आहे. याआधी शिरीष कुंदरने १८ मिनिटांचा लघूपट केला होता. ‘क्रिती’ असे या लघूपटाचे नाव होते. तसेच त्यामध्ये राधिका आपटे, नेहा शर्मा आणि मनोज वाजपेयी यांनी मुख्य भूमिका निभावली होती.