भारतातील १० पैकी ७ विवाहित महिला या त्यांच्या पतीची फसवणूक करतात असे एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅप ग्लीडेन (gleeden) ने मंगळवारी केलेल्या एका सर्वेक्षणात आढळले आहे. कारण घरगुती कामांमध्ये त्यांना सहभागी व्हायचे नसते. काही महिलांनी केवळ यासाठी त्यांच्या जोडीदारांना धोका दिला कारण त्यांचे वैवाहिक जीवन कंटाळवाणे झाले होते.
भारतात ५ लाखांपेक्षा जास्त ग्लीडेन नावाच्या या डेटिंग अॅपचे यूजर्स आहेत आणि ‘महिला अडल्टरी म्हणजेच व्यभिचार का करता’ या शीर्षकाने या अॅपने एक सर्व्हेक्षण केले. ज्यात खुलासा झाला की, अशा महिलांची संख्या सर्वात अधिक बंगळुरु, मुंबई आणि कोलकाता सारख्या महानगरांमध्ये आहे, ज्या त्यांच्या पतीला धोका देतात.
याबाबत माहिती देताना ग्लीडेनचे मार्केटिंग एक्सपर्ट सोलेन पॅलेट यांनी म्हटले की, १० पैकी ४ महिलांचे असे मत आहे की, मजा-मस्ती अनोळखी लोकांसोबत केल्यानंतर त्यांचे जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत झाले आहे. २० टक्के पुरुष आणि १३ टक्के महिलांनी आपल्या जोडीदाराला दगा दिल्याचे ५ लाख भारतीय ग्लीडन यूजर्समध्ये मान्य केले.
२००९ मध्ये फ्रान्समध्ये ग्लीडन अॅपला लॉन्च करण्यात आले होते. भारतात ग्लीडेन २०१७ मध्ये आले आणि दोन वर्षात त्यांचे भारतात ३० टक्के सदस्य आहेत. ३४ वर्षांपासून ते ४९ वर्षांच्या विवाहित महिलांचा यात समावेश आहे. ग्लीडेनचा वापर करणाऱ्या जवळपास ७७ टक्के भारतीय महिलांनी हे मान्य केले की, त्यांच्या पतीसोबत त्यांनी दगा केला कारण त्यांचे वैवाहिक जीवन नीरस झाले होते आणि त्यांना वैवाहिक जीवनाबाहेर एक साथीदार शोधून त्यांच्या जीवनात नवा उत्साह मिळाला. भारतात पारंपारिक विवाहात अडकलेल्या समलैंगिक लोकांनाही मोठ्या प्रमाणात या अॅपची मदत मिळत असल्याचे या सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.