बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत सुश्मिता सेन राहत आहे लिव्ह-इनमध्ये

sushmita-sen
अभिनेत्री सुश्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून प्रोफेशनल लाईफपेक्षा आपल्या पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत आहे. मॉडल रोहमन शॉलला सध्या सुश्मिता डेट करते आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर रोहमनसोबतचे अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. एकंदरीत तिच्या अशा वागण्यावरुन या नात्याला ती पुढे घेऊन जाण्याचा विचार करत असल्याचा अंदाज येतो.


यासंदर्भात स्पॉटबॉय या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, आता सुश्मिताच्या घरी शिफ्ट रोहमन झाला आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार सुश्मिताच्या बांद्रातल्या घरी रोहमन रोज येत होता. तो सुश्मिताच्या दोनही मुलांशी चांगलाच मिसळला आहे. त्यामुळे आता दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.


सुश्मिता रोहमनच्या आधी रितिक भसीनला डेट करत होती. पण दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतर सुश्मिता आणि रोहमनची एका फॅशन इव्हेंटमध्ये दरम्यान भेट झाली. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम. दोघेही गेल्या काही दिवसांत अगदी बिनधास्त एकमेकांसोबत फिरताना दिसत आहेत. सुश्मिताला लग्नासाठी रोहमनने प्रपोज केले असून सगळे काही जुळून आले तर नव्या वर्षांत दोघेही लग्न करू शकतात. सध्या मोठ्या पडद्यापासून सुश्मिता दूर आहे. पण रोमान्स आणि लूक्सच्या बातम्यांमुळे ती कायम चर्चेत असते.

Leave a Comment