विजयच्या ‘थलपति 63’मध्ये शाहरूख खलनायक!

shahrukh-khan
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक अत्ली आणि बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान यांच्यात ब-याच दिवसांपासून ‘थलपति 63’ संदर्भात चर्चा सुरु होती. या चर्चेला अलीकडे बळ मिळाले, ते शाहरूख व अत्ली यांच्या आयपीएलदरम्यान एकत्र येण्याने. दोघेही आयपीएल मॅचदरम्यान एकत्र दिसले आणि ‘थलपति 63’मध्ये शाहरूख दिसणार, या चर्चेला पुन्हा तोंड फुटले.
shahrukh-khan1
शाहरूख विजयच्या या चित्रपटात कॅमिओ करतान दिसू शकतो. चित्रपटात शाहरूख मुख्य खलनायकाच्या भूमिकेत असेल. त्याची क्लायमॅक्सदरम्यान एन्ट्री होईल. जवळजवळ १५ मिनिटांची भूमिका किंगखानच्या वाट्याला असेल. यादरम्यान विजय व शाहरूख यांचा एक फाईटिंग सीक्वेन्सही दिसेल.
shahrukh-khan2
बॉलिवूडचा एक आघाडीचा चेहरा ‘थलपति 63’मध्ये असावा, अशी निर्मात्यांची इच्छा होती. ही आॅफर शाहरूखकडे आली, त्याने तेव्हा लगेच ती स्वीकारली. अत्ली याचनिमित्ताने शाहरूखला भेटले. अत्ली यांच्या डोक्यात या भेटीत आणखी एक कल्पना आली. ‘मर्शल’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याची आणि त्यात शाहरूखला कास्ट करण्याची इच्छा अत्ली यांनी यावेळी बोलून दाखवली. ‘मर्शल’च्या हिंदी रिमेकची कल्पना शाहरूखने म्हणे लगेच उचलून धरली. ‘मर्शल’ या चित्रपटातही विजय लीड रोलमध्ये होता.

Leave a Comment