व्होडाफोनची प्रीपेड ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर !

vodafone
नवी दिल्ली: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुरसंचार क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध कंपन्या अनेक ऑफर लाँच करत आहेत. बाजारात रिलायन्स जिओ दाखल झाल्यापासून अनेक कंपन्याना टाळे देखील लागले आहे. तसेच रिलायन्स जिओला टक्कर देताना काही नामंकित कंपन्या दिसत आहेत. व्होडाफोन कंपनी यासाठीच त्यांची धमाकेदार ऑफर घेउन येत आहे. ही ऑफर अगदी खास असून यामधून प्रीपेड ग्राहकांना मोठा लाभ मिळणार आहे.

९९९ रुपयांची ऑफर व्होडाफोन कंपनीने त्यांच्या प्रीपेड ग्राहकांसाठी आणली आहे. ग्राहकांना या ऑफरमध्ये अनलिमिटेड लोकल+एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग यांसारखी सुविधा देण्यात आली आहे. यासोबत ग्राहकांना १२ जीबी डेटा आणि प्रतिदिन १०० एसएमएस मिळणार आहेत. तसेच या ऑफरची कालावधी ३६५ दिवसांचा असणार आहे. मात्र ही ऑफर केवळ पंजाब सर्कलसाठी उपलब्ध करण्यात आली आहे, असे कंपनीने सांगितले आहे. व्होडाफोन कंपनीने याआधी १६९९ रुपयांचे प्लॉन लॉन्च केले होते. याचा कालावधी 365 दिवसांचा असून प्रतिदिन १ जीबी ४जी डेटा देण्यात आला आहे.

Leave a Comment