रेल्वेतील आरोग्य सेवा झाली महाग

indian-railway
मुंबई : चालत्या ट्रेनमध्ये तुमची तब्येत बिघडली आणि डाॅक्टरांना तुम्हाला बोलवावे लागले तर त्यासाठी तुम्हाला 100 शुल्क द्यावे लागणार आहेत. ही व्यवस्था रेल्वे बोर्डाने पूर्ण रेल्वेत सुरू केली आहे. 100 रुपये स्टेशनवर मिळणारा प्राथमिक उपचार घेण्यासाठी डाॅक्टरांची फी आणि औषधांसाठी द्यावे लागतील.

चालत्या ट्रेनमध्ये मिळणार ही सुविधा माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सुरू केली होती. यात प्रवासात प्रवाशांची तब्येत बिघडली तर ट्विटर आणि फोनच्या माध्यमातून मदत मिळू शकते. पण खोट्या तक्रारींमध्ये काही दिवसांपासून वाढ झाली आहे. म्हणजे काही वेळा हातपाय दुखतात अशा छोट्या तक्रारींसाठी मदत मागायला सुरुवात झाली होती. म्हणूनच वैतागून रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रवासात येणाऱ्या अडचणींकडे रेल्वे गांभीर्याने बघत आहे. एखाद्या गरोदर स्त्रीला अनेकदा प्रसूती वेदना सुरू झाल्यावर ट्रेन थांबवण्यात आली होती. उपचारानंतरच ट्रेन सोडली गेली. उपचारानंतर रेल्वेने पहिल्यांदा 20 रुपये फी नक्की केली होती. रेल्वेचे डाॅक्टरही ही रक्कम इतकी कमी असल्यामुळे ते घेत नव्हते. रेल्वेकडून त्यासाठी त्यांना काही मिळतही नव्हते. इकडे ट्विटरवर रेल्वे डाॅक्टरांनी तक्रार केली. डाॅक्टर मग ओपीडी सोडून स्टेशनवर ट्रेनची वाट बघत उभे असलेले दिसायचे. यामुळे हाॅस्पिटलमधील रुग्णावरच्या उपचारांमध्येही अडथळे यायचे. स्टेशन अधिकाऱ्यांप्रमाणे प्रवासी प्रवासात डाॅक्टरांची मदत घेत असतील तर आता 100 रुपयांची पावती दिली जाईल. ही पावती रेल्वेचा टीटी देईल.

Leave a Comment