घर बसल्या मिळवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेवेचा फायदा

state-bank
मुंबई : देशाची सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांची खूप काळजी घेत असते. नुकतीच स्पेशल ग्राहकांसाठी डोअर स्टेप बँकिंग सेवा बँकेने सुरू केली आहे. 70 वर्षाहून मोठे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग ग्राहक यांच्यासाठी ही सुविधा असून कॅश पिकअप आणि डिलिव्हरीसहित अनेक सेवा यात आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आदेशांनुसार डोअर स्टेप सेवा सुरू झाली आहे.

6 सुविधा यात असून कॅश पिकअप आणि डिलिव्हरी, चेक पिकअप, चेकबुकच्या मागणीसाठी भरलेल्या रिसिटची पिकअप, ड्राफ्टची डिलिव्हरी आणि टर्म डिपाॅझिटचा सल्ला, लाइफ सर्टिफिकेटचं पिकअप, इन्कम टॅक्स वाचवण्याशाठी फाॅर्म 15Hचं पिकअप यांचा यात समावेश आहे.

केवायसी झालेले खातेधारकच डोअरस्टेप बँकिंग सेवेचा फायदा घेऊ शकतात. तुमचा वैध मोबाइल बँकेजवळ नंबर आहे. तुमचे घर एसबीआय शाखेच्या 5 किमीमध्ये असायला हवे. याचा फायदा जाॅइंट अकाऊंट, छोट्या मुलांचं अकाऊंट आणि नाॅन पर्सनल अकाऊंट घेऊ शकत नाही. या सेवेसाठी ग्राहकांना शुल्क द्यावे लागेल. आर्थिक व्यवहार असेल, तर प्रति व्यवहार 100 रुपये द्यावे लागतील. आर्थिक नसलेल्या व्यवहारासाठी 60 रुपये द्यावे लागतील. तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन रजिस्टर करावे लागेल. दिव्यांग व्यक्तींना मेडिकल सर्टिफिकेट द्यावे लागेल. अधिक माहिती https://www.sbi.co.in/portal/web/services/doorstep-banking-services येथे मिळेल.

Leave a Comment