‘चौकीदार चोर है’ वक्तव्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींचे स्पष्टीकरण

rahul-gandhi
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेल प्रकरणी ‘चौकीदार चोर है’ अशी टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने चौकीदार चोर आहे हे देखील म्हणत असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. ते यावरून वादात सापडले होते. त्यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले होते. या वक्तव्यावर आज सुनावणी सुरू होती. राहुल गांधी यांनी त्यावेळी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने चौकीदार चोर आहे हे म्हटले नसल्याचे स्पष्टीकरण राहुल यांनी दिले आहे. राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर करत दिलगिरी व्यक्त केली. हे वक्तव्य निवडणुकीत दरम्यान बोलण्याच्या ओघात निघाल्याचे त्यांनी म्हटले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय सुनावणार आहे.

राहुल गांधींविरोधात भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी अवमान याचिका दाखल केली होती. जे काही वक्तव्य सर्वोच्च न्यायालयासंदर्भात केले आहे ते चुकीचे असल्याचे 15 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. असे कोणतेही वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाने केले नाही आणि असे वक्तव्य करण्यासारखा न्यायालयासमोर कोणता प्रसंगही नव्हता. कारण त्यावेळी कागदपत्रांच्या स्वीकार आर्हतेवर निर्णय घ्यायचा होता, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. यासंदर्भात राहुल यांना सर्वोच्च न्यायालयाने 22 एप्रिल पर्यंत उत्तर देण्यास सांगितले आणि 23 एप्रिलला सुनावणी होईल असेही म्हटले होते.

Leave a Comment