लखनौ – समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम खान यांनी उत्तर प्रदेशमधील रामपूर येथील भाजप उमेदवार जया प्रदा यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आम्हाला बजरंग बली हवेत, अली देखील हवेत, पण अनारकली नको, असे त्यांनी म्हटले आहे.
आझम खान यांच्या मुलाचे जया प्रदांविषयी वादग्रस्त वक्तव्य
रविवारी उत्तर प्रदेशमधील पान दरीबा येथे आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला खान यांनी जनसभा घेतली. अब्दुल्ला यांनी या सभेत जया प्रदा यांच्यावर निशाणा साधताना वादग्रस्त वक्तव्य विधान केले. अली आणि बजरंबली या दोघांची आम्हाला आवश्यकता आहे. पण अनारकली आम्हाला नको, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. अब्दुल्ला यांचे वडील आझम खान यांनी देखील यापूर्वी जया प्रदा यांच्या बॉलिवूड कनेक्शनवरुन टीका करत वाद निर्माण केला होता. नाचणारी आणि गाणारी खासदार नको, असे आझम खान यांनी म्हटले होते.
आझम खान यांनी रविवारी झालेल्या सभेत सांगितले की, सध्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. त्यांच्यावरही आरोप होत आहेत. मग मी तर काहीच नाही. मी जनतेला लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्याचे आवाहन करतो. रामपूरमधील प्रशासन भाजप उमेदवाराची मदत करत आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. माझ्या समर्थकांच्या घरावर छापा टाकला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.