देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून जिंकुन येण्यासाठी विविध उमेदवार प्रचाराच्या तोफा गाजवत आहेत. आपल्याला मतदारांनी निवडुन देण्यासाठी हे उमेदवार अनेक प्रलोभन, आश्वासनेही देताना दिसतात. निवडणुक संपल्यानंतर त्यातील किती आश्वासने पुर्ण होताना दिसतात, हे सर्वांनाच माहिती आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अशाच आशयावर एक विनोद शेअर केला आहे. सध्या चाहत्यांनी हा विनोद उचलुन धरला आहे.
‘बिग बीं’नी शेअर केला निवडणुकीशी संदर्भात विनोद
T 3140 -" पत्नी- शादी से पहले तुम मुझे होटल,
सिनेमा, और न जाने कहां- कहां घुमाते थे
शादी हुई तो घर के बाहर भी नहीं ले जाते..
पति- क्या तुमने कभी किसी को…
चुनाव के बाद प्रचार करते देखा है " ~ Ef 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 21, 2019
पती-पत्नीच्या नाते संबंधांवर सोशल मीडियावर अनेक विनोद फिरत असतात. पती-पत्नीमधील एक मजेशीर संवाद बिग बी यांनीदेखील शेअर केला आहे. यामध्ये ‘पत्नी तिच्या पतीला म्हणते, की लग्नापूर्वी तुम्ही मला हॉटेल, सिनेमा आणि कुठे-कुठे घेऊन जात होते. आता लग्न झाल्यापासून मला घराच्या बाहेरही नेत नाहीत. तिचा पती यावर म्हणतो, तू निवडणुकीनंतर कधी कोणाला प्रचार करताना पाहिलेस का’? या विनोदावर बिग बींनी हास्याच्या ईमोजीदेखील शेअर केल्या आहेत. त्यांच्या या विनोदावर काही चाहत्यांनी देखील हसण्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी मात्र, ‘बिग बीं’नी पत्नीवर अशाप्रकारचा विनोद केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.