चीनच्या बॉक्स ऑफिसवर ‘अंधाधुन’ने कमावले ३०० कोटी

andhadhun
मुंबई – आयुष्मान खुरानाच्या मागच्या वर्षी रिलीज झालेल्या ‘अंधाधुन’ चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार केला होता. ‘अंधाधुन’च्या यशाची घोडदौड आता भारतातच नव्हे, तर चीनच्या बॉक्स ऑफिसवरही सुरुच आहे. ‘अंधाधुन’ने चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे.

चीनमध्ये आत्तापर्यंत ‘दंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टार’, ‘बजरंगी भाईजान’, ‘हिंदी मीडियम’ आणि ‘हिचकी’ हे चित्रपट टॉप पाच क्रमाकांमध्ये होते. ‘अंधाधुन’ चित्रपटाचाही यामध्ये समावेश झाला होता. सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटालाही ‘अंधाधुन’ने मागे टाकले आहे. आत्तापर्यंत ३०० कोटींची कमाई करत हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

सस्पेन्स थ्रिलर ‘अंधाधुन’ हा चित्रपट होता. आयुष्मानने या चित्रपटात अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. राधिका आपटे आणि तब्बु यांची देखील या चित्रपटात मुख्य भूमिका होती. आयुष्मानच्या करिअरमधील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Leave a Comment