अक्षयसोबत ‘सूर्यवंशी’मध्ये झळकणार कतरिना

akshay-kumar
प्रेक्षक आतुरतेने अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहित शेट्टीच्या चित्रपटांची वाट पाहत असतात. रोहितने अशात ‘सिंबा’ चित्रपटातूनच आपल्या आगामी चित्रपटाचीही घोषणा केली होती. या चित्रपटाचे ‘सूर्यवंशी’ असे शीर्षक आहे. अक्षय कुमार चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार हेदेखील जाहीर करण्यात आले होते.


पण अक्षयच्या अपोझिट यात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले होते. प्रेक्षकांची या भूमिकेबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच चित्रपटातील अभिनेत्रीचे नावही आता समोर आले आहे. बॉलिवूडची चिकनी चमेली म्हणजे कॅटरिना कैफ यात अक्षयच्या अपोझिट झळकणार आहे.

याआधी अक्षय आणि कॅटरिनाने ‘सिंग इज किंग’, ‘तीस मार खान’, ‘वेलकम’, ‘नमस्ते लंडन’ आणि ‘दे दना दन’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तर कॅटरिनाचा रोहित शेट्टीसोबत हा पहिलाच चित्रपट असणार आहे. त्यामुळे, प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नक्कीच खास असणार आहे. चित्रपटात अक्षय पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे.

Leave a Comment