गुगलच्या या फोनसमोर करु नका असले तसले चाळे

google
एक अफलातून फिचर असलेला स्मार्टफोन गुगलने बाजारात आणल्यामुळे उत्तम क्वालिटीचा कॅमेरा देणारी कंपनी अशीही गुगलची ओळख निर्माण झाली आहे. गुगलने गुगल पिक्सल 3 या आपल्या स्मार्टफोनमध्ये किस करताच फोनमधला कॅमेरा तात्काळ फोटो काढेल असे लेटेस्ट फिचर जोडले आहे. ‘Photobooth Mode’ या नावाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेले हे अफलातून फिचर ओळखले जाते.
google1
जर तुम्हाला या फिचरचा वापर करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पिक्सल 3 स्मार्टफोनचे फोटोबूथ मोड ऑन करावे लागेल. त्यानंतर मोबाईलमधील कॅमेरा हावभाव पाहताच समजून घेईल की तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि त्याचक्षणी तो फोटो क्लिक करेल.
google2
किस डिटेक्शनचे फिचर गुगलने आपल्या या स्मार्टफोनमध्ये जोडले आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या खास व्यक्तीला किस कराल तेव्हा तात्काळ तुमचा फोटो निघेल असा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनमधील AI किसिंग डिटेक्शन मोडमुळे कॅमेरा समोरच्याचे हावभाव डिटेक्ट करतो आणि तात्काळ फोटो घेतो. एरवी असे फोटो काढताना होणारी अडचण आता या मोबाईलमुळे कपल्सला होणार नाही असा दावा कंपनीने केला आहे.
google3
गुगलने आपल्या मोबाईलमध्ये असे अफलातून फिचर आणण्यासाठी फोटोग्राफर्सना सोबत घेतले आणि पाच महत्त्वाचे एक्सप्रेशन शोधून काढले. Pixel 3 मधील 6.2 गुगल कॅमेरा अपडेट असून, चेहऱ्यावरील पाच प्रकारचे हावभाव त्यात देण्यात आले आहेत.

Leave a Comment