सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत प्रिया प्रकाशचे हे फोटो

priya-prakash
आपल्या एका अदाकारीच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर रातोरात प्रकाशझोतात आलेली प्रिया प्रकाश वारिअर पुन्हा एका चर्चेचा विषय बनली आहे. तिचा साडीतील लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा लुक सर्वांना घायाळ करणारा आहे. ती या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

View this post on Instagram

💫

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on


प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फोटो शेअर केले आहेत. 2 लाख 34 हजार लोकांनी हे फोटो पाहिले आहेत. तिचे चाहते तिच्या या नव्या लुकचे खूप कौतुक करताना दिसत आहेत. ‘ओरू आदर लव्ह’या मल्याळम चित्रपटाद्वारे प्रिया प्रकाश वारिअरने सिने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. प्रिया या चित्रपटातील डोळे मिचकावण्याच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर स्टार झाली होती. पण प्रेक्षकांच्या पसंतीत उतरण्यात हा चित्रपट अयशस्वी ठरला.
priya-prakash1
दिग्दर्शक ओमर लुलू आणि अभिनेत्री नूरीन शरीफने चित्रपटाच्या अपयशानंतर एक धक्कादायक खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की, सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत असलेल्या प्रियाला फिमेल लीडमध्ये घेण्यासाठी त्यांच्यावर निर्मात्यांनी दबाव टाकला होता. दिग्दर्शक ओमर लुलू म्हणाले, सुरुवातीला ‘ओरू आदर लव्ह’ या चित्रपटाचे कथानक खूप वेगळे होते. एका तरुण कपलवर आधारित हा चित्रपट होता. ज्यांची नंतर हत्या केली जाते. पण निर्मात्यांनी प्रियाला हायलाइट करून चित्रपट बनवण्यास सांगितले.
priya-prakash2
प्रिया याशिवाय लवकरच ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहे. प्रशांत माम्बुली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पण हा चित्रपट त्याचे नाव आणि पोस्टरवरून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात प्रियांशु चटर्जीचीही प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून हा चित्रपट यातील बाथटबच्या सीनमुळे वादाचे कारण बनला होता. या सीनला दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूशी जोडण्यात आले. या चित्रपटाच्या निर्मात्यांना श्रीदेवी यांचे पती आणि निर्माता बोनी कपूर यांनी लीगल नोटिस सुद्धा पाठवली होती.
priya-prakash3
प्रियाने या वादानंतर आपली प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली, माझ्या चित्रपटावर वाद व्हावेत अशी माझी अजिबात इच्छा नाही. मी नेहमीच नकारात्मकतेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. हा मुद्दा दिग्दर्शक आणि निर्माता सांभाळतील. मी फक्त मला दिलेली भूमिका साकारत आहे.

Leave a Comment