मिलिंद सोमण या फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत

milind-soman
2018 मध्ये फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण हा अंकिता हिच्याशी विवाहबद्ध झाला. दोघांचे नाते दोघांच्या वयातील अंतरामुळे नेहमीच चर्चेत राहिले होते. सोशल मीडियामार्फत दोघांवर सातत्याने टीकाही झाली. पण त्याकडे दोघांनी पूर्ण दुर्लक्ष केले.


मिलिंदचा स्विमिंग पूलमध्ये इंटेन्स लुकमधला फोटो त्याच्या सर्वोत्कृष्ट फोटोंपैकी एक असल्याचे त्याचे चाहते मानतात. मिलिंदने हा फोटो काही दिवसांपूर्वीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. मिलिंदला फिटनेस फ्रिक प्रवासाची प्रचंड आवड असून तो पत्नीसोबत अनेकदा हॉलिडे एन्जॉय करताना दिसतो. त्याचे तेव्हाचे फोटो अनेकदा व्हायरलही होतात.


पत्नीसोबतचे फिटनेस आयकॉन मिलिंदचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात मिलिंद आणि अंकिता स्विमिंग पूलमध्ये फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. काहीशा बोल्ड अंदाजातील या फोटोंमध्ये मिलिंद आणि अंकिता एकदम परफेक्ट कपल दिसत आहेत.


मिलिंदची पत्नी अंकितानेही हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून सध्या सोशल मीडियावर तिचा हा बिकिनी लुक चर्चेचा विषय आहे. मिलिंद प्रमाणेच अंकितासुद्धा फिटनेस फ्रीक आहे. नेहमीच काही ना काही कारणाने मिलिंद सोमण आणि अंकिता चर्चेत असतात. अशा प्रकारे मिलिंद-अंकिताचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होणे ही पहिलीच वेळ नाही. या दोघांचे फोटो या आधीही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.


त्याचे आणि अंकिताचे नात तसेच दोघांमधील वयातील अंतराविषयी काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत मिलिंदने बोलला. वयाला मी फारसे महत्त्व देत नाही, दोन व्यक्ती नेहमीच वेगळ्या असतात मग त्यांचे वय असो किंवा संस्कृती. त्यामुळे माझ्या आणि अंकिताच्या वयातील अंतराचा मला काहीही फरक पडत नाही.

Leave a Comment