चक्क भाजप कार्यकर्तेच म्हणत सुटले ‘चौकीदार चोर है’

satpal-satti
शिमला – भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात निदर्शने करताना चक्क ‘चौकीदार चोर है’, अशी घोषणा दिल्यामुळे मोठी फसगत झाली आहे. हिमाचल प्रदेशच्या ऊना येथे ही घटना घडली आहे. ते भाजप अध्यक्ष सतपाल सत्ती यांच्या समर्थनात घोषणाबाजी करत होते. दरम्यान त्यांच्या तोंडून चुकून ही घोषणा निघाली ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

प्रियंका गांधी यांच्यावर हिमाचल प्रदेशातील भाजप अध्यक्ष सतपाल सत्ती यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. संपूर्ण राज्यात त्यानंतर संतापाची लाट उसळली होती. सत्ती यांच्या घरासमोर सकाळपासूनच विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ज्यामुळे संपूर्ण परिसराला छावनीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

असे असताना गड राखण्याची संपूर्ण भाजप कार्यकर्त्यांनीही तयारी केली होती. काँग्रेस विरोधात ते सत्तींच्या घरासमोर निदर्शने करत होते. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पुतळाही त्यांनी जाळला. यावेळी भाजपच्या एका कार्यकर्त्याने चौकीदार नावाची घोषणा दिली. त्याच जोशाने उपस्थित कार्यकर्त्यांनी ही घोषणा समोर वाढवत ‘चौर है’, असे म्हटले. अनेवेळा या घोषणेचा पुनरुच्चार झाला. जोशा-जोशात होश गमावलेल्या कार्यकर्त्यांना आपली चूक लक्षात आल्यानंतर अचानक घोषणा थांबवून त्यांनी परत काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या या घोषणा कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.

Leave a Comment