रोहित तिवारींचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांची हत्या झाली

rohit-tiwari
नवी दिल्ली – काही दिवसांपुर्वीच दिवंगत एन. डी. तिवारी यांचे पुत्र रोहित तिवारी यांच्या निधनानंतर शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांचा मृत्यू नैसर्गिक झालेला नसून त्यांची हत्या करण्यात आली असल्याची शंका या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तींविरोधात त्यावरून भादंवि कलम ३०२ अंतर्गत दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहितला पत्नी आणि आईने मंगळवारी दिल्लीच्या साकेत रुग्णालयात दाखल केले होते. त्याला डॉक्टरांनी जेथे मृत घोषित केले. हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला, असा कयास त्यावेळी डॉक्टरांनी वर्तवला होता. पण त्यानंतर शवविच्छेदन अहवालात हा मृत्यू नैसर्गिक नसून हत्या असल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडालेली आहे.

रोहितच्या मृत्यूसंदर्भात आरोग्य मंडळाने पोलिसांना जवळपास ८ ते १० पानांचा शवविच्छेदन अहवाल दिला आहे. मृत्यूचे कारण त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेले नाही. हा अहवाल वैद्यकीय भाषेत लिहिलेला असल्यामुळे पोलीसही गोंधळात पडले होते. दिवसभर विविध तज्ज्ञांचा त्यांनी सल्ला घेतला होता. त्यानंतरही पोलिसांना मृत्यूचे कोडे उलगडण्यात अपयश येत राहीले.

अखेर फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर त्याची हत्या झाली असावी, असा अंदाज लावण्यात येत आहे. उशीने तोंड आणि नाक दाबून त्याची हत्या करण्यात आली असवी, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यावरून डिफेन्स कॉलनी पोलिसांनी तक्रारही नोंदवून घेतली आहे.

Leave a Comment