१० ते १२ हजार मुस्लिमांना बळजबरीने हिंदू धर्मात प्रवेश करण्यास भाग पाडणार

ranjeet-srivastav
लखनौ – भाजप लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर दाढी काढण्याची मशिन चीनमधून आणल्यानंतर जवळपास १० ते १२ हजार मुस्लिमांना बळजबरीने हिंदू धर्मात प्रवेश करण्यास भाग पाडणार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते रणजीत बहादुर श्रीवास्तव यांनी केले आहे. त्यांनी हे वक्तव्य उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका सभेला संबोधित करताना केले. राजकीय वातावरण त्यांच्या या वक्तव्यानंतर तापण्याची शक्यता आहे.

गुरूवारी लोकसभा निडवणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध पक्षांनी तिसऱ्या टप्प्यासाठी कंबर कसलेली आहे. यातच भाजप नेते एकामागून-एक वादग्रस्त वक्तव्य करताना समोर येत आहेत. त्यातच आता श्रीवास्तव यांच्या वक्तव्याची भर पडली आहे.

मागील ५ वर्षामध्ये मुस्लिमांचे मानसिक धैर्य पंतप्रधान मोदी यांनी खचवले आहे. मुस्लिमांना संपवायचे असेल तर आपणाला मोदींना निवडून देणे महत्वाचे आहे. अन्यथा ते आपणाला त्यांची वाढती संख्या आणि मतदानाच्या हक्काचा वापर करून संपवतील, असेही श्रीवास्तव यांनी म्हटले. जर आपण मोदींना मत दिले नाही. तर याचा परिणाम भोगण्यास तयार रहा, असे वक्तव्याही त्यांनी यावेळी केले.

Leave a Comment